म्हसवड शहरात कोरोनाचा भडका : एकाच दिवशी सापडले ८ नवे रुग्ण


 

स्थैर्य, म्हसवड दि.१९ : म्हसवड शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होवु लागली असुन दररोज वाढत जाणारे आकडे हे म्हसवडकरांचा ठोका वाढवत आहेत. दरम्यान दि.१९ रोजी म्हसवड शहरातील ८ जणांचा कोरोना अहवाल हा बाधित आल्याने शहरात कोरोनाचा भडका उडाल्याची भिती व्यक्त होत आहे.

म्हसवड शहरात कोरोना संसर्ग वाढण्याचे प्रमाण यापुर्वी खुप हळु व कमी असल्याने म्हसवड जनता याबाबतीत समाधान व्यक्त करीत होती मात्र गत दोन दिवसांपासुन शहरात कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने होवु लागली असुन आजवर ही संख्या ३८ वर गेली आहे तर एकाच दिवशी ८ रुग्ण हे बाधित सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरात कोरोनाचा हा आकडा पुढील काही दिवसांत आणखी वाढण्याची भिती व्यक्त होत असुन नागरीकांनी स्वत:ची काळजी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने केले जात आहे.

एकीकडे शहरात गणरायाच्या आगमनाची घरोघरी तयारी सुरु असतानाच शहरात कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली असुन आता पर्यंत शहरातील ४ जणांचा बळीही या साथीने घेतला आहे तर दररोज वाढत जाणारे आकडे आणखी कितीजणांना आपल्या विळख्यात घेणार याचीच चर्चा शहरात सुरु आहे.

दरम्यान शहरात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी म्हसवड शहराच्या बाजारपेठेत अद्यापही काही नागरीक बिनधास्तपणे मोकाट फिरत असल्याचे चित्र असुन त्यांचा हा बिनदास्तपणाच कोरोनाला आमंत्रण देत असल्याचे बोलले जात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!