दैनिक स्थैर्य | दि. १८ जून २०२४ | फलटण |
फलटण तालुक्याच्या पूर्वभागातील जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी संचलित हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये पहिल्या दिवशी दाखल झालेल्या नवगतांचे मोफत पाठ्यपुस्तके, शालेय साहित्य आणि जिलेबी वाटप करून गोड स्वागत करण्यात आले.
शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचा आनंदात जावा, अभ्यासाशिवाय आवड निर्माण व्हावी म्हणून पहिल्या दिवशी नवगतांचे उत्साहात स्वागत करण्यात येते. विद्यालयात दाखल झालेल्या नवगतांचे प्राचार्य सस्ते सर यांनी स्वागत केले.
शालेय वर्षात कोणत्याही प्रकारची शैक्षणिक उणीव भासणार नाही, स्कॉलरस्पिप छचचड २०२४-२५ परीक्षेसाठी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची तयारी जादा तास घेऊन केली जाईल, सर्वांना मोफत प्रवेश दिला जाईल, असे यावेळी प्राचार्य सस्ते यांनी सांगितले.
प्रास्ताविक मोहन ननवरे सर यांनी केले. यावेळी गोखळी विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब गावडे, माजी सरपंच नंदकुमार गावडे, सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव, मोहन बागाव आणि विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.