वडजल येथे कृषीकन्यांचे आगमन

पिक पद्धतीसह शेती विकासाचा करणार अभ्यास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १८ जून २०२४ | फलटण |
वडजल, ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित कृषी महाविद्यालय, फलटणमधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाल्या आहेत. बारा आठवडे चालणार्‍या या कार्यक्रमामध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची विविध प्रात्यक्षिके शेतकर्‍यांना दाखवली जाणार आहेत.

वडजल येथील ग्रामपंचायत कार्यालयाला कृषिकन्यांनी भेट दिली. त्यावेळी सरपंच रेश्मा ढेंबरे, माजी सरपंच संगीता ढेंबरे, सदस्य नाथा तांबे, विठ्ठल सुळ, पोपट सुळ, संतोष खलाटे, सोनाली इथापे, अपर्णा सुळ यांनी कृषी कन्यांचे स्वागत केले.

कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रात्यक्षिकांवर आधारित उपक्रम राबविला जातो. यादरम्यान विद्यार्थी प्रत्यक्ष गावामध्ये वास्तव्य करून ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणी, त्यांचे जीवनमान, सामाजिक व आर्थिक स्तर, संबंधित गावातील पिक पद्धती अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत.

तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती आधारित उद्योग, व्यवसाय व इतर हवामानाविषयी जास्तीत जास्त माहिती विविध अ‍ॅपद्वारे कशी संपादित करता येईल, याबाबत कृषीकन्या ज्ञानेश्वरी जाधव, जगताप प्राजक्ता, धुमाळ सई, गिरमे ऐश्वर्या, खिलारे सुप्रिया, गावडे शुभांगी, गायकवाड श्रेया, जगताप धनश्री, या शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत. कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमामध्ये शेवटच्या चार आठवड्यात कृषिकन्या कृषी आधारित उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेतील.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे व प्रा. नितिशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभणार आहे. ग्रामीण भागात शेती करत असताना दररोज भेडसावत असलेल्या समस्यांचे निराकरण या कृषिकन्यांकडून करण्यात येत असते. त्यामुळे शेतकर्‍यांमधून या कृषिकन्यांचे स्वागतच होत असते.


Back to top button
Don`t copy text!