शिवजयंतीनिमित्त पै.पप्पू शेख यांच्यावतीने सरबत वाटप; फलटणला सामाजिक ऐक्याचे दर्शन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›
दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२२ । फलटण । येथील पै.पप्पू शेख यांनी मुस्लिम बांधवांसमवेत शिवजयंतीच्या मिरवणूकीतील सर्वांना सरबत वाटप करुन सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.
शिवजयंतीच्या निमित्ताने फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने फलटण शहरात भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. सदरची मिरवणूक शहरातील शुक्रवार पेठ येथून जात असताना पै.पप्पू शेख मित्र मंडळाचे कार्यकर्ते व चाँदतारा मशिदीतील मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीतील सर्वांना सरबत वाटप करून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. युवा नेते श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर यांनीही मिरवणूकीदरम्यान या कार्यक्रमास भेट देवून उपक्रमाचे कौतुक केले.
दरम्यान, राज्यात एकीकडे भोंगे – हनुमान चालिसा यावरुन सामाजिक वातावरण दूषित होत असताना पै.पप्पू शेख यांच्या उपक्रमातून फलटणमध्ये सामाजिक सलोख्याचे मूळ किती घट्ट आहे; याचे दर्शन घडल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांमधून उमटत होती.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!