‘परशुराम पुरस्कार २०२४’चे शनिवारी वितरण


दैनिक स्थैर्य | दि. २० जून २०२४ | फलटण |
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक), केंद्र फलटण यांच्याकडून देण्यात येणारा ‘परशुराम पुरस्कार’ यंदा फलटणचे सुप्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अवधूत वसंत गुळवणी यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार, दि. २२ जून २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ, फलटण येथे संपन्न होणार आहे.

या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अखिल ब्राह्मण संस्था नाशिकचे उपाध्यक्ष श्री. कुंदनकुमार साठे (पुणे) हे असणार आहेत. यावेळी जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था, कराडचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे, कार्याध्यक्ष श्री. उदयकुमार मुंगी, कार्यवाह सुभाष सबनीस व केंद्रप्रमुख, केंद्र कार्यकारिणी सदस्य, फलटण केंद्र यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!