वीर, नीरा-देवघर, गुंजवणी पाणलोट क्षेत्रात अल्पसा पाऊस

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २० जून २०२४ | फलटण |
नीरा-देवघर, वीर व गुंजवणी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला समाधानकारक नसली तरी सुरुवात झाली असून भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही आगामी काळात समाधानकारक पाऊस होईल आणि सर्व धरणे भरतील, अशी अपेक्षा आहे.

२३ टीएमसी क्षमतेच्या भाटघर धरण परिसरात काल पाऊस नाही, पण आजपर्यंत १३१ मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात १.४३ टीएमसी म्हणजे ६.०९ टक्के पाणीसाठा आहे.

१० टीएमसी क्षमतेच्या वीर धरण परिसरात काल ०.०४ मि. मी. पाऊस झाला आहे. आजपर्यंत १२० मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात १.८७ टीएमसी म्हणजे २०.०८ टक्के पाणीसाठा आहे.

१३ टीएमसी क्षमतेच्या नीरा – देवघर धरण परिसरात काल ०.०३ मि. मी. पाऊस झाला असून आजपर्यंत ८८ मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात १.०० टीएमसी म्हणजे ८.५२ टक्के पाणीसाठा आहे.

४ टीएमसी क्षमतेच्या गुंजवणी धरण परिसरात काल ०.०७ मि. मी. पाऊस झाला असून आजपर्यंत १२५ मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात ०.३६ टीएमसी म्हणजे ९.७५ टक्के पाणीसाठा आहे.

Back to top button
Don`t copy text!