सौ. शांताबाई गेजगे यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. २० जून २०२४ | फलटण |
सोनगाव (ता. फलटण) ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सौ. शांताबाई कोंडीबा गेजगे (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने कोळकी (ता. फलटण) येथील राहत्या घरी (दि. १७ रोजी) निधन झाले.

१५ वर्षे सोनगाव ग्रामपंचायतीच्या सदस्या होण्याचा मान त्यांनी मिळवला होता. आपल्या सदस्यत्वाच्या काळात गावातील स्वच्छता, आरोग्य याबरोबरच स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांचा हिरीरीने पुढाकार होता. अत्यंत निर्मळ आणि मृदू स्वभावाच्या असणार्‍या सौ. शांताबाई गेजगे यांच्या निधनाने सोनगावसह कोळकी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पती, ४ मुले, सुना, नातवडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.


Back to top button
Don`t copy text!