स्थैर्य, फलटण, दि. 10 : वाई तालुक्यातील मेणवली ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देवून फलटण येथील मायभूमी फौंडेशनने मेणवली गावामध्ये प्रतिकारशक्ती वर्धक दोन प्रकारच्या गोळयांच्या ३०० स्ट्रिप्स, एन ९५ मास्क व थ्री प्लाय मास्कचे वाटप नुकतेच करण्यात आले. ग्रामपंचायतीस गोळ्या व मास्क उपलब्ध करून दिल्याबद्दल मेणवली ग्रामपंचायतीच्या वतीने मायभूमी फौंडेशनचे अध्यक्ष मिलिंद नेवसे यांचे विशेष आभार मानले. या सोबतच अशोक शिंदे यांचे सुद्धा आभार ग्रामपंचायतीच्या वतीने मानण्यात आले.
या वेळी मेणवली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. लक्ष्मी वेदपाठक, उपसरपंच संजय चौधरी, ग्रामसेविका सौ. शुभांगी चव्हाण, मायभूमी फौंडेशनचे लक्ष्मण उद्गट्टी, सदस्य मारुती काटे, राजेश नवघणे, माजी सरपंच संतोष तांबे, कोव्हीड ग्रामदक्षता समिती सदस्य मोहन पाटणे, आदित्य चौधरी, अजय निंबाळकर यांच्यासह आशा व अंगणवाडी सेविकांची प्रमुख उपस्थिती होती.