हळदी कुंकवाबरोबरच आरोग्य साहित्याचेही वाटप


हळदी कुंकवासाठी आलेल्या महिलांना आरोग्य साहित्य वाटप करताना सारीका क्षीरसागर 

 

स्थैर्य, कातरखटाव, दि. ३० : गौरी गणपती सनानिमित्त घरी येणाऱ्या महिलांना हळदी कुंकूवाचा मान सन्मान करण्याबरोबरच त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक आरोग्य साहित्य वाटप करण्याचा उपक्रम वाकेश्वर (ता.खटाव ) येथील नवशक्ती महिला बचत गटाच्या माध्यमातून राबविण्यात आला.

वडूज येथील ब्रम्हचैतन्य आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सारीका धनंजय क्षीरसागर या बचत गटाच्या संस्थापक सचिव आहेत. त्यांनी यावर्षी आपल्या घरगुती गणेशोत्सवा समोर आकर्षक देखावा तयार केला आहे. या देखाव्यात ऑनलाईन शिक्षण पद्धतीने मोबाईल, टॅब द्वारे शिक्षण घेणाऱ्या गौरी, मास्क शिवणाऱ्या गौरी, कोरोना 

जनजागृती करणारी गौरी असे देखावे सादर केले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेस मास्क व आसेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले. मुंबई मनपाचे नगरसेवक व चांदवली विधानसभा मतदार संघ भाजपा अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांच्या सहकार्यातून हे वाटप करण्यात आले. दरम्यान वडूज येथील बाजार पेठेतील निवृत्त भूमी अभिलेख अधिकारी अशोकराव गाढवे यांच्या राहत्या घरीही गणपती समोर शेषनागावर आरूढ विष्णू लक्ष्मी हा देखावा तयार केला आहे. त्यांची नात अमृता गाढवे व सून रूपाली अजित गाढवे यांनी या देखाव्यासाठी परिश्रम घेतले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!