क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्यावतीने ब्राह्मण गल्लीत मोफत औषधांचे वाटप

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 09 जुलै 2024 | फलटण | येथील क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने फलटण येथील ब्राम्हण गल्ली येथे अखिल भारतीय ब्राम्हण संस्था नाशिक केंद्र फलटण केंद्र फलटण व क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने मोफत औषध वाटप करण्यात आले आहे.

प्रतिवर्षी अखिल भारतीय ब्राम्हण संस्था नाशिक केंद्र फलटणच्या व क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून फलटण शहरातील ब्राह्मण गल्ली येथे मोफत औषध वितरीत करण्यात येते. प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मोफत औषध वितरण करण्यात आले. यावेळी फलटण शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. अवधूत गुळवणी, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी, प्रसन्न जोशी, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे, फलटण तालुका क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सदरील उपक्रमाबाबत डॉ. अवधूत गुळवणी, डॉ. प्रसाद जोशी यांच्यासह मानयवरांनी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे यांचे विशेष आभार मानले व आगामी काळात सुद्धा असेच सहकार्य लाभणार असल्याची ग्वाही मिलिंद नेवसे यांनी यावेळी दिले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!