दैनिक स्थैर्य | दि. १४ एप्रिल २०२३ | फलटण |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त निरगुडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे युवा तरुण आणि युवा उद्योजक सहदेव बनसोडे, अजय सोनवणे, दयानंद बनसोडे, मुकेश सोनवणे यांच्या विशेष सहकार्याने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारीत पुस्तक व चित्रकलेच्या वह्यांचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचले पाहिजेत. तसेच जयंती ही नाचून नाही तर वाचून साजरी झाली पाहिजे, या हेतूने प्रेरित होऊन या युवकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राविषयीचे पुस्तक वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेचे सचिन काकडे सर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मार्गदर्शन केले व आपले मनोगत व्यक्त केले.
सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर न घेता, डोक्यात घेतले पाहिजे असे सांगितले.
प्रशांत सोनवणे, धनंजय लकडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांनी वाचले पाहिजेत तरच ते समजतील, असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषद शाळा निरगुडीच्या मुख्याध्यापिका सौ. उर्मिला वसव मॅडम, श्रीमती उज्ज्वला भोकरे मॅडम, श्री. महेंद्र बर्गे सर, सचिन काकडे सर, सौ. जयश्री कदम मॅडम, श्री. अभिजित रणवरे, सौ. उमा भोसले मॅडम, सर्व शिक्षक तसेच महावीर बनसोडे, किशोर सोनवणे, धनंजय लकडे, पत्रकार प्रशांत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे, तुकाराम आवटे, जगन्नाथ सोनवणे तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.