संगिनी फोरमकडून माऊली प्रसाद आश्रमातील मुलींना ब्लँकेट वाटप

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑगस्ट २०२४ | फलटण |
जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनच्या सप्ताह कार्यक्रमात अनुकंपाअंतर्गत संगिनी फोरम फलटणच्या वतीने माऊली प्रसाद अनाथ आश्रमातील अनाथ मुलींसाठी सुमारे ४०+ मुलींना ब्लँकेट वाटप करण्यात आले. तसेच १५ ऑगस्टच्या शुभमुहूर्तावर जिलेबी देऊन राष्ट्रीय सण साजरा करण्यात आला. यावेळी अनाथ मुलींसाठी कपड्यांचे वाटपही करण्यात आले.

फलटण तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. मंगेशभाई दोशी, लायन्स क्लबचे बाळासाहेब भोंगळे, जैन सोशल ग्रुपचे उपाध्यक्ष श्री. श्रीपाल जैन व संगिनीच्या संस्थापक अध्यक्षा स्मिता शहा, संगिनी फोरमच्या अध्यक्षा अपर्णा जैन, माजी अध्यक्षा नीना कोठारी, सचिव प्रज्ञा दोशी, संध्या महाजन, किशोरी शहा, नेहा दोशी, जयश्री उपाध्ये, सुरेखा उपाध्ये, वृषाली गांधी आदी उपस्थित होते.

संगिनी फोरमच्या या कार्याबद्दल माऊली प्रसाद आश्रमाकडून धन्यवाद देण्यात आले.

Back to top button
Don`t copy text!