दुधेबावी येथे अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे ग्रामस्थांना वितरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दुधेबावी, दि. ३१ : करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पुण्याचे आयकर उपायुक्त तुषार मोहिते कुटुंबीय,  दुधेबावी ग्रामपंचायत आणि दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त सहभागाने गावातील सर्व ९०० कुटुंबांना होमिओपॅथिक अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वितरण करण्यात आले असून सदर गोळ्या सकाळी अनुषा पोटी सलग तीन दिवस घ्यावयाच्या असल्याचे सांगण्यात आले आहे.

दुधेबावी गावामध्ये मुंबई पुणे व इतर जिल्ह्यातून ४३ लोक आले असले तरी सर्व ४३ जणांना होमक्वारंटाईन  केले आहे. महाराष्ट्र  राज्य पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, सरपंच मधुकर वावरे, उपसरपंच भाऊसाहेब मोरे, ग्रामविकास अधिकारी एस. आर. बोबडे, ग्रामपंचायत सदस्य, दक्षता कमिटीतील सदस्य त्यांच्यावर नजर ठेवून आहेत.  ४३ लोकांमधील १४ दिवस पूर्ण झालेले १४ लोक असून उर्वरीत २९ लोक १४ दिवस पूर्ण  क्वारंटाइन राहणार आहेत.

कोविड १९ या रोगाचा संसर्ग पसरु नये म्हणून होमिओपॅथिक अर्सेनिक अल्बम ३० गोळयांचे वितरण करण्यात आले आहे. या गोळ्या प्रत्येक व्यक्तीने रोज सकाळी उपाशी पोटी तीन ते चार गोळ्या प्रत्येक दिवशी अशा तीन दिवस खाणे गरजेचे आहे. गोळ्या घेतल्यानंतर १५ ते ३० मिनिट काही खायचे नाही ज्या दिवशी गोळ्या खाणार आहेत त्या दिवशी कच्चा कांदा व लसुण खाऊ नये, कॉफी पिऊ नये असे सांगण्यात आले आहे.

या गोळ्यांचे वाटप ग्रामपंचायत लेखनिक सोमनाथ सोनवलकर, शिपाई पठाण व पाणी पुरवठा शिपाई प्रमोद दडस यांनी सोशल डिंस्टसिंग ठेउन घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाला एक डबी या प्रमाणे केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!