फलटण तालुका वारकरी संघटना, लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन यांच्यातर्फे वारकर्‍यांना १० हजार शेवचिवडा पाकिटांचे वाटप


दैनिक स्थैर्य | दि. १० जुलै २०२४ | फलटण |
फलटण तालुका वारकरी संघटना, लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन, मलठण यांच्यातर्फे वारकर्‍यांना १०,००० शेवचिवडा पाकीट वाटप शुभारंभ डॉ. प्रसाद जोशी, डॉ. प्रसन्न जोशी, हभप केशवराव जाधव महाराज, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, जंगम सर, घनवट सर, दशरथ भोसले, दादा भोसले, नाना शिंदे, राजाभाऊ नागटीले, प्रदीप गोडसे, मोहनराव रणवरे, नितिन जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.

फलटण तालुका वारकरी संघटना, लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन व विश्व हिंदू परिषद वैद्यकीय सेवा पथक पश्चिम महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने वारकर्‍यांसाठी वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वारकरी भवनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अभिनव महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळाच्या वतीने वारकर्‍यांना पोहे व पाणी बॉटल वाटपाचा शुभारंभ माजी नगरसेवक अशोकराव जाधव, किरण वणवे, अक्षय कुचेकर, अक्षय खलाटे व मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी केला.

तसेच शिवछत्रपती क्रीडा मंडळ, मलठण व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वतीने वारकर्‍यांना मोफत चहा व बिस्कीटांचे वाटप माजी नगरसेवक अशोकराव जाधव, अमोल घाडगे, राजाभाऊ निंबाळकर, महेश घाडगे,कैलास गायकवाड व मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी केला.


Back to top button
Don`t copy text!