
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १० जुलै २०२४ | फलटण |
फलटण डॉक्टर असोसिएशन यांच्यातर्फे माऊलींच्या पालखी सोहळ्यात जवळजवळ २००० बिस्कीटांचे पुडे, १२०० बॉटल पाणी, मोफत औषधोपचार करण्यात आले. या कार्यात मोठ्या संख्येने फलटण डॉक्टर असोसिएशनचे सदस्य सहभागी झाले होते.
फलटण डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र बिचुकले, उपाध्यक्ष डॉ. अशोक नाळे, डॉ. स्वप्ना जाधव पाटील, सचिव डॉ. चेतन गुंदेच्या, खजिनदार डॉ. वल्लभ कुलकर्णी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. माऊली सोहळ्यातील वारकर्यांनी मोठ्या संख्येने या सेवांचा लाभ घेतला.
