राजाळ्याच्या त्या ग्रामपंचायत सदस्याला अपात्र करा; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. 19 डिसेंबर 2023 | फलटण | गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य यांचे कढून होतं असलेला गैरकारभार माहिती अधिकारात उघडकीस आला आहे. यातच जागेच अतिक्रमण, ग्रामपंचायत कामकाजात गैरव्यवहार प्रकरणे आढळून आल्याने जानाई देवी ग्रामविकास पॅनेलचे विद्यमान सदस्य अपात्र ठरविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते निखिल निंबाळकर यांनी केली आहे.

या बाबत निखिल निंबाळकर यांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की; श्री जानाई देवी ग्रामविकास पॅनेलचा विद्यमान सदस्य गैरकारभार करत असल्याचे आरोप करण्यात आला आहे. ही बाब माहिती अधिकारात उघडकीस आल्याने ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य रामभाऊ भगवान निंबाळकर ग्रामपंचायतीच्या संगनमताने महाराष्ट्र शासनाच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या जागेतील गाळा बेकायदेशीर दस्त करून खरेदी केला असल्याची बाब समोर येत आहे. सामाजिक कार्यकर्ते निखिल निंबाळकर यांनी माहितीच्या अधिकारात मिळवून जिल्हाधिकारी यांचे कोर्टात तक्रार करून अर्ज दिला आहे.

Back to top button
Don`t copy text!