राज्य सरकार बरखास्त करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २५ : सध्या राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. राज्याचे गृहमंत्री पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत खंडणी गोळा करत आहेत. राज्यातील इतर काही मंत्र्यांवर महिलांनी आरोप केलेले आहेत. एवढे सगळे होऊन सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री काहीही बोलण्यास तयार नाहीत व कोणालाही भेटण्यास तयार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र सरकार बरखास्त करावे, अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभेमध्ये केली.

सध्या नवी दिल्ली येथे संसदेचे अधिवेशन सुरू आहे. या मध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्य सरकारचा पर्दाफाश करत सध्या राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचे लोकसभेमध्ये निदर्शनास आणून दिले.

राज्यातील बऱ्याच मंत्र्यांवर महिलांनी गंभीर स्वरूपातील आरोप केलेले आहेत. तरी सुद्धा त्या मंत्र्यांना पाठीशी घालण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. मंत्र्यांवर आरोप झाल्यावर तातडीने चौकशी होवून कारवाई करणे गरजेचे आहे. परंतु सध्या महाराष्ट्रात असे काहीही होताना दिसत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे भेटण्यासाठी वेळ नाही. सध्या देशामध्ये कोरोना म्हणजेच कोव्हिड १९ चे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. कोरोना परिस्थिती हाताळायला सुद्धा राज्य सरकार अपयशी झालेले आहे. अशा सर्व विविध गोष्टींचा आढावा घेऊन महाराष्ट्रातील राज्य सरकार बरखास्त करणे अत्यंत आवश्यक आहे, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभेच्या अधिवेशना दरम्यान स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!