
दैनिक स्थैर्य | दि. 22 जून 2025 | फलटण | वीर धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार आज दि. 22 जून रोजी दुपारी 12.00 वाजता वीर धरणाच्या विदुयतगृहाद्वारे 2100 क्युसेस व सांडव्याद्वारे 4637 क्युसेस असा एकूण 6737 क्युसेस विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. म्हणून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये आवश्यक तो बदल करण्यात येईल, याची नोंद घेण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी संबंधितांची राहील, असे सुद्धा नीरा कालव्याच्या कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.