दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेत फलटणच्या मूकबधिर विद्यालयाचा दबदबा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 20 मार्च 2025। फलटण । सातारा जिल्ह्यातील समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस परेड ग्राउंडवर जिल्हास्तरीय दिव्यांग मुलांच्या मैदानी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या स्पर्धेत महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयाच्या मुलांनी उज्वल यश प्राप्त केले आहे. विशेषतः, मूकबधिर विद्यालय ठाकूरकी ता.फलटण या शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली.

या स्पर्धेत एकूण १३ विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाले. यापैकी प्रथम क्रमांक विजेते शंभू बापू मसुगडे लांबउडी १६ ते २१ वयोगट, श्रीनाथ अनिल जाधव १०० मीटर पोहणे १६ ते २१ वयोगट, कु. निर्मला पांडुरंग पुणेकर लांबउडी वयोगट १६ ते २१, कु. निर्मला पांडुरंग पुणेकर २०० मीटर धावणे वयोगट १६ ते २१ यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे खेळाडू नागपूर येथे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचे महात्मा शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष दादासाहेब चोरमले, सचिव सौ. वैशाली चोरमले, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली शिंदे, मार्गदर्शक शिक्षिका विजया भोजने, हेमा गोडसे, उदय निकम, निर्मला चोरमले, नितेश शिंदे, चैतन्य खरात यांनी अभिनंदन केले आहे. ही स्पर्धा दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!