दिलीपसिंह भोसलेंचा माजी खासदार रणजितसिंहच्या हातात हात

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 28 जुलै 2024 | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे शिल्पकार दिलीपसिंह भोसले हे आगामी काळामध्ये सोबत जाणार असल्याच्या चर्चा फलटण शहरामध्ये जोरदार रंगू लागल्या आहेत.

आज फलटण येथे “चंदुकाका सराफ” यांच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समवेत दिलीपसिंह भोसले होते. त्यावेळी एकमेकांना हातात हात देत विविध चर्चा केल्याने विविध चर्चांना उधाण आलेले आहे.

उद्घाटन सोहळ्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आल्यानंतर त्या ठिकाणी दिलीपसिंह भोसले व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये विविध चर्चा झाल्या आहेत. त्यावेळी अनेक फलटणकर नागरिकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!