दिगंबर लाळगे यांचा वाढदिवस मूकबधिर विद्यार्थ्यांबरोबर साजरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २९ जानेवारी २०२५ | फलटण |
फलटण येथील युवा उद्योजक, ‘चायनीज कट्टा’ हॉटेलचे मालक दिगंबर दत्तात्रय लाळगे यांचा वाढदिवस २० जानेवारी २०२५ रोजी फलटण येथील महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयातील मुलांबरोबर साजरा करण्यात आला.

लाळगे यांनी असा वाढदिवस साजरा करून युवकांना संदेश दिला आहे की, कोठेही पार्टी करणे अथवा रात्री अपरात्री चौकात केक कापणे, त्यापेक्षाही कितीतरी पटीने या प्रशालेतील मुलांबरोबर वाढदिवस साजरा करून आनंद मिळतो. आजकालची तरुणाई वाढदिवसासाठी पार्ट्यांमध्ये हजारो रुपयांचा चुराडा करतात, ही बाब खेदजनक आहे. उलट तरुण मुलांनी सामाजिक कार्यात सहभागी होऊन अशा मूकबधिर मुलांमध्ये जाऊन वाढदिवस साजरा करणे, हे प्रेरणादायी ठरेल, असे मला वाटते.

यावेळी दिगंबर लाळगे यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले, महात्मा शिक्षण संस्थेच्या सचिव सौ. वैशाली चोरमले, मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली शिंदे, उपशिक्षिका सौ. विजया मठपती, उपशिक्षका सौ. हेमा गोडसे व निर्मला चोरमले, प्रयाग सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रीती भोजने, पत्रकार दीपक मदने यांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!