दैनिक स्थैर्य | दि. 16 सप्टेंबर 2024 | फलटण | पंढरपूर येथे धनगर समाजातील माझे काही सहकारी बंधू आरक्षणासंदर्भात उपोषणाला बसलेले आहेत. मी कायम धनगर समाजाच्या सोबतच राहणार आहे. मी यापूर्वी सुद्धा लोकसभेमध्ये धनगर आरक्षणाबाबत वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. बहुतांश धनगर समाज हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याच्या कारणामुळे धनगर समाजाला आरक्षण हे मिळालेच पाहिजे!; अशी भूमिका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केली.
पंढरपूर येथे धनगर समाजातील समाज बांधव आरक्षणाला बसलेले आहेत. त्या ठिकाणी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सदिच्छा भेट दिली. त्या भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी भाजपा नेते जयकुमार शिंदे व लतीफ तांबोळी यांची उपस्थिती होती.
धनगर समाजातील जे बांधव उपोषणाला बसलेले आहेत त्यांची माजी खासदार रणजितसिंह यांनी तब्येतीची विचारपूस करत कोणतीही मदत लागली तर आपण करण्यास तयार असल्याची भूमिका सुद्धा यावेळी त्यांनी स्पष्ट केली.