अनुप शहा खोटारडे : पांडुरंग गुंजवटे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 16 सप्टेंबर 2024 | फलटण | अनुप शहा यांनी निवडणुकीच्या तोंडावर खोट्या गुन्ह्यांच्या आधारे, माझ्यावर केलेले आरोप हे खोटे व बिनबुडाचे आहेत. माझ्यावर सागर शहा यांनी २०२१ मध्ये नगरपरिषद येथील केसमध्ये काही तथ्य नसल्याचे व माझाविरुद्ध मुद्दाम बनाव केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आणि तसा लेखी पुरावा मला माहितीच्या अधिकारामध्ये फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेला आहे. यामध्ये असे लिहिले आहे की, दिलेल्या तक्रारी प्रमाणे घटनास्थळाची पाहणी, साक्षीदार यांच्याकडे तपास केल्यावर असे दिसुन येते की, यातील फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी प्रमाणे कोणतीही घटना घडल्याबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध झाला नाही तसेच गुन्हा घडल्याचा मुद्दाम बनाव केल्याचे दिसुन येत आहे; असे मत माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केले.

याबाबत प्रसिद्धी पत्रकात गुंजवटे म्हणाले की; तसेच विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी सन २०१९ मध्ये माझ्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल खोटी तक्रार दाखल करण्यात आली होती त्यामध्येही न्यायालयाने मला दिनांक ०७ जुलै २०२३ रोजी निर्दोष मुक्त केले आहे त्याची जजमेंट कॉपी देखील माझ्याकडे आहे.

ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल झालेल्या केस मध्ये देखील न्यायालयाने माजी निर्दोष मुक्तता केली आहे. या केसमध्ये तर स्वतः अनुप शहा यांनीच मी निर्दोष असल्याचे त्यांनी दिलेल्या जबाबामध्ये सांगितले आहे. त्यामुळे श्री.अनुप शहा यांनी केवळ निवडणुकीचा स्टंट केला असून, हे सर्व कोणाच्या आदेशाने होत आहे ते सुज्ञ नागरिक जाणत असल्याचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!