दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑक्टोबर २०२१ | फलटण | येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आदरांजली अर्पण करुन मान्यवरांना ‘बोधीवृक्ष’ भेट देवून धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी फलटण शहर पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, पत्रकार नासीर शिकलगार, अशोक उर्फ शक्ती भोसले, बापुराव जगताप, युवराज पवार, मुंबई येथील उद्योजक शंकरशेठ पवार, काकासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादीचे सामाजिक कार्यकर्ते हरिश काकडे, उद्योजक संग्राम अहिवळे, अक्षय अहिवळे, आदित्य साबळे, शिवेंद्र कांबळे यांनी परिश्रम घेतले.
डॉ.बाळासाहेब काकडे यांनी मान्यवरांचे आभार मानले.