
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, मुंबई, दि. ८: ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी लिहिले कि,
ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या निधनानं अर्ध्या शतकाहून अधिक काळ मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटवणारं दिग्गज व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका आणि चतुरस्त्र अभिनयामुळे ते कायम रसिकांच्या स्मरणात राहतील. श्रीकांत मोघे साहेबांचे निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहतो.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य



