ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरुण निगवेकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,दि. २४ : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.अरुण निगवेकर सरांनी देशातील शिक्षणाचा दर्जा आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मोलाचे योगदान दिले. आयुष्यभर त्यांनी पदार्थ विज्ञाना सारख्या कठीण विषयात संशोधनासह अध्यापनाचे अनमोल कार्य केले. पुणे विद्यापीठात शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आणि त्याचा लौकिक वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. कुलगुरु म्हणून काम करताना त्यांनी पुणे विद्यापीठाला वेगळ्या उंचीवर नेले. ‘नॅक’चे संशोधन संचालक म्हणून डॉ.अरुण निगवेकर सरांनी भारतातील व्यापक आणि क्लिस्ट अशा उच्चशिक्षण पद्धतीसाठी गुणवत्ता मापन करण्याची सरळ आणि सोपी पद्धत विकसीत केली. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द संस्मरणीय राहिली. शैक्षणिक क्षेत्रातील बदलांचा अचूक वेध घेत काळाच्या दोन पाऊले पुढे चालत त्यांनी ‘व्यास’ ही देशातली पाहिली शिक्षण वाहिनी सुरु केली. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला डॉ. निगवेकर सरांचे कार्य कायमच प्रेरणा देत राहील, त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील दिपस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.


Back to top button
Don`t copy text!