
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, मुंबई, दि. ११: वाशिम जिल्ह्यातील कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाशदादा डहाके यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. प्रकाशदादा डहाके यांच्या निधनाने ग्रामीण जनतेशी नाळ जुळलेले, शेतकरी, कष्टकरी बांधवांची दु:ख दूर करण्यासाठी तळमळीनं कार्य करणारे संघर्षशील नेतृत्वं हरपले आहे. प्रकाशदादांचं निधन ही कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाची, वाशिम जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक चळवळीची तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी आहे. मी स्वर्गीय प्रकाशदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सर्वजण डहाके कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.



