नागरी नोंदणी पध्दती अंतर्गत जन्म नोंदणीमध्ये बाळाचे नाव समाविष्ट करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि.०३ मे २०२२ । सातारा । ज्या नागरिकांची अथवा त्यांच्या पाल्यांची जन्म नोंदणी नावाशिवाय झाली असेल व जन्म नोंदणी होऊन 15 वर्षे पूर्ण झाली असतील, त्या नागरिकांनी अशा जन्म नोंदणीमध्ये नावाची नोंदणी करुन घ्यावी. यामध्ये सन 1969 पूर्वीच्या जन्म नोंदणीचा सुध्दा समावेश आहे. नावाची नोंदणी दि. 27 एप्रिल 2026 पर्यंत करता येईल. यानंतर कोणत्याही परिस्थितीत जन्मनोंदणी मध्ये बाळाच्या नावाची नोंदणी करता येणार नाही. नाव नोंदणीसाठी ज्या ठिकाणी जन्माची नोंदणी केली आहे तेथे नागरिकांनी संपर्क साधावा, असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांनी कळविले आहे. 

Back to top button
Don`t copy text!