दैनिक स्थैर्य | दि. ३१ जुलै २०२३ | रायगड |
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२३ अंतर्गत कृषी महाविद्यालय, दापोली येथून कृषि सहयाद्री गटाचे माणगावमध्ये आगमन झाले आहे. या गटाने कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या डठख SRI (System of Rice Intensification) पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण शेतकर्यांना दिले.
या पद्धतीमध्ये दोन रोपांमधले अंतर २५ सेमी बाय २५ सेमी असल्याने मुळांना इजा होत नाही. तसेच फुटव्यांची आणि लोंब्यांची संख्या वाढते व उत्पन्नामध्ये १५ ते २० टक्के वाढ होते. पुनर्लागवडीत उत्पन्नात होणारी प्रचंड घट कमी करता येते. असे अनेक फायदे शेतकर्यांना समजावून सांगितले. यावेळी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानावर आणि शेतकर्यांच्या भात लावणीत येणार्या समस्या, या विषयावर शेतकरी आणि विदयार्थ्यांमध्ये चर्चा झाली.
यासाठी कृषी सह्याद्री गटाच्या विद्यार्थ्यांना कृषी महाविद्यालय दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद सावंत, प्रा. डॉ. विरेश चव्हाण, सहयोगी प्रा. डॉ. संदीप गुरव, सहाय्यक प्रा. डॉ. रणजित देव्हारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या प्रात्यक्षिकासाठी माणगावमधील प्रगतशील शेतकरी श्री. जयंत कुबल, श्री. चेतन नार्वेकर आणि ग्रामपंचायत माणगाव यांनी उत्कृष्ट सहकार्य केले.