
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२२ । फलटण । महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषीकन्यांनी कृषी कार्यानुभव उपक्रम २०२२ – २३ अंतर्गत धुमाळवाडी येथील शेतकऱ्यांसमोर ‘रोप लागवडीसाठी गादीवाफा तयार करणे’ या विषयाचे प्रात्यक्षिक सादर केले.
यावेळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, प्रा. एन .एस. ढालपे, प्रा. एन. ए. पंडित, प्रा. एस. वाय. लाळगे व विषय मार्गदर्शक प्रा. एस. एन. आडत यांचे कृषीकन्या ऋतुजा आवारे, ऋतुजा पवार, तेजस्विनी शिंदे, प्राची व्यवहारे, ऋतुजा रणवरे, महेश्वरी मांजरे, स्नेहल शिंदे यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
