धुळदेव येथे कृषिकन्यांकडून देण्यात आले दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचे प्रात्यक्षिक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ३० जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचे प्रात्यक्षिक दिले.

कृषीकन्या सिद्धी शेटे, साक्षी जाधव, समृद्धी जगताप, सिद्धिका कांबळे, स्वेजल पाटील, प्रियांका शिंदे, प्रियांका भोसले व श्वेता सस्ते यांनी दुधावर प्रक्रिया करून त्यापासून ‘खवा’ हा पदार्थ तयार करण्याचे प्रात्यक्षिक महिलांसमोर सादर केले. त्याअंतर्गत त्यांनी खवा तयार करण्याची शास्त्रीय पद्धत सविस्तररित्या सांगितली व त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

तसेच त्यांनी खव्याचे विविध प्रकार जसे की, दाणेदार खवा, पिंडी खवा, ढाप खवा इत्यादींची स्पष्ट माहिती दिली. तसेच या खव्यापासून तयार होणारे इतर पदार्थ जसे की, पेढा, बर्फी, गुलाबजामुन इत्यादींची ही सविस्तररित्या माहिती दिली. खवा बनवण्याच्या घरगुती पद्धती व्यतिरिक्त नवीन आधुनिक यंत्र (इलेक्ट्रिक खवा मशीन) वापरून खवा तयार करण्याची पद्धत याचीही ओळख महिलांना करून दिली. दुग्धप्रक्रियेचा लघुउद्योग सुरू करण्याची कल्पना ही महिलांना दिली. या उपक्रमास महिलांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित, प्रा. अश्विनी नगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!