बाजारात रानमेव्याला वाढली मागणी


दैनिक स्थैर्य । 13 मे 2025। सातारा । जिभेला अविट गोडी आणणारा डोंगरचा रानमेवा वाई तालुक्याच्या बाजारपेठांत दाखल झाला आहे. करवंदे, जांभूळ या रानफळांचा समावेश रानमेव्यात आहे. येथील गल्लीबोळात विक्रेत्या महिलांच्या आरोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. रानमेव्याला चांगली मागणी आहे. 30 रुपयाला चिपटे अशा माफक दरामुळे खवय्यांच्या हा रानमेवा पसंतीला उतरत आहे.

वाई तालुक्यातील धोम, मांढरदेव परिसरातून हा रानमेवा दाखल होतो. प्रामुख्याने करवंदे, जांभळे यासह अन्य रान फळांचा समावेश रानमेव्यात असतो. या फळांना आयुर्वेदात मोठे महत्त्व आहे. खासकरून उन्हाळ्यात तयार होणारा रानमेवा खवय्यांना आकर्षित करतो. तालुक्यातील बाजारपेठात या फळांना मोठी मागणी असते. डोंगरची काळी मैना म्हणून प्रसिद्ध असलेली करवंदे आणि जांभूळ खवय्यांच्या पसंतीस उतरत आहेत. जिभेला अविट गोडी निर्माण करत आहे. लहानग्यांसह, तरुण त्याकडे आकर्षित होताना दिसतात. महिला विक्रेत्या फळांची टोपली घेऊन गल्ली बोळातून आरोळी देत फिरून फळाची विक्री करताना दिसत आहेत.


Back to top button
Don`t copy text!