डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये वाईन विक्रीचा निर्णय मागे घेण्याची मागणी


दैनिक स्थैर्य । दि.३० डिसेंबर २०२१ । सातारा ।  डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये वाईन विक्री विषयी प्रस्तावित शासन निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना करण्यात आली.

याबाबत सातारा शाखा व परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमान निवासी जिल्हाधिकारी थोरवे यांना निवेदन देण्यात आले. डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये वाईन विक्री विषयी प्रस्तावित शासन निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, वंदना माने, अ‍ॅड. हौसेराव धुमाळ, उदय चव्हाण, रुपाली भोसले, योगिनी मगर, कुमार मंडपे, डॉ. दीपक माने, विजय पवार, भगवान रणदिवे, प्रमोदिनी मंडपे, अस्लम तडसरकर हे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!