
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण, दि.०५: स्थैर्य, फलटण दि.5 : मौजे भाडळी, ता.फलटण येथील स्मशानभूमीची प्रचंड दुरावस्था झाली असून गावात तातडीने सुसज्ज स्मशानभुमीची उभारणी व्हावी अशी मागणी भाडळी ग्रामस्थांमधून होत असून या प्रश्नाबाबत कोळकी पंचायत समितीचे सदस्य सचिन रणवरे यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे मोहनराव डांगे यांनी स्पष्ट केले.
सद्यस्थितीत भाडळी गावातील मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी स्मशानभूमीचा पत्रा शेड वादळामुळे जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे स्मशानभुमीच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.
