सदोष मतदार यादीमुळे मतदान घटणार?; पदवीधरच्या सर्वच उमेदवारांना फटका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, सातारा, दि.२३ : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उशिरा का होईना मतदारांची यादी प्रसिद्ध झाली; पण या यादीत अनेक त्रुटी आहेत. ज्यांची नावे यादीत आहेत, त्यांची नावे ऑनलाइन यादीत दिसत नाहीत, तर ज्यांची नावे ऑनलाइन यादीत आहेत, त्यांची नावे प्रसिद्ध केलेल्या यादीत नाहीत, तर अनेकांची नावे चुकलेली आहेत. त्यामुळे अशा मतदारांची मतदानावेळी अडचण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्ह्याची सदोष यादी दुरुस्त करून पुन्हा प्रसिद्ध करावी, अशी मागणी पक्षाच्या नेत्यांकडून होऊ लागली आहे. 

जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठीच्या मतदारांच्या यादीत 52 हजार 71 मतदारांची नोंद झालेली आहे. मतदार नोंदणीसाठी राष्ट्रवादी, कॉंग्रेससह भाजपच्या नेत्यांनी परिश्रम घेतलेले आहेत. मागील आठवड्यात मतदारांची यादी जिल्हास्तरावरून प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी प्रसिद्ध करण्यात जिल्हास्तरावरून उशीर झाला. काही पक्षांच्या नेत्यांनी तक्रारी केल्यानंतर पक्षांच्या प्रतिनिधींना यादी उपलब्ध झाली. त्यानंतर मतदान केंद्रनिहाय यादीची विभागणी करण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे. पदवीधरसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच खरी लढत असणार आहे. मुळात पदवीधर मतदारांची मतदानाचा टक्का कमी असतो; पण यावर्षी या निवडणुकीत निर्माण झालेली चुरस लक्षात घेता जास्तीतजास्त मतदान करण्याकडे सर्वच पक्षांनी लक्ष घातले आहे. 

चैत्यभूमीवर गर्दी न करता जिथे आहात, तिथूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करा’- उद्धव ठाकरे

मतदार यादीच्या मदतीने मतदारांपर्यंत पोचण्याचे काम उमेदवारांचे प्रतिनिधी करतात; पण जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे याचा परिणाम मतदानावर होणार आहे. ज्यांनी नोंदणी केलेली आहे, त्यांची नावे यादीत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अशा मतदारांना मतदान करताना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. काही ठिकाणी मतदारांनी नोंदणी करताना आधारकार्डावरील पत्ता देण्याऐवजी सध्या राहात असलेला पत्ता दिला आहे. त्यामुळे आधारकार्डवरील पत्त्यानुसार मिळणारे मतदान केंद्र व प्रत्यक्ष राहात असलेल्या ठिकाणच्या पत्त्यानुसार होणारे मतदान केंद्रे वेगवेगळी असतात. त्यामुळे मतदारांची ससेहोलपट होते. पत्त्यानुसार जवळचे मतदान केंद्र मिळत असतानाही केवळ आधारकार्डनुसार दूरचे केंद्र मिळते. त्यामुळे असे मतदार दूरच्या मतदान केंद्राकडे जाण्यास तयार होत नाहीत. अशावेळी सध्या राहात असलेल्या ठिकाणच्या परिसरातील मतदान केंद्रावरच नाव असणे सोयीचे होते. मात्र, या यादीत तसे झालेले नाही. त्यामुळे यादीतील घोळ सोडविण्याची जबाबदारी पक्षांसोबत जिल्हा प्रशासनानेही पार पाडणे गरजेचे आहे. 

जिल्ह्यातील मतदार, केंद्रे… 

पदवीधरचे मतदार : 59 हजार 071 

शिक्षकचे मतदार : 7711 

मतदान केंद्रे : 165 

पदवीधर : 122 

शिक्षकसाठी : 43


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!