कोपर्डे हवेलीत सिध्दनाथ-माता जोगेश्वरी हत्तीवर स्वार; आकर्षक पूजेने वेधले लक्ष

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, कोपर्डे हवेली (जि. सातारा), दि.२३ : येथे सिध्दनाथ मंदिरात बारा दिवसांचे नवरत्न सुरू असून देवाला पोषाखाव्दारे विविध रुपे दिली जात आहेत. आज सोमवारी श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीची हत्तीवर स्वार झालेली पूजा बांधण्यात आली. याप्रसंगी सिध्दनाथाला फुलांनी सजवले होते. 

भक्तीमय वातावरणात गावचे पुजारी महादेव गुरव, दत्तात्रय गुरव, कृष्णात गुरव व त्यांच्या कुटुंबातील सदस्य नवरत्न काळातील बारा दिवस श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीची विविध रुपातील आकर्षक पूजा बांधतात. १९९५ साली सिध्दनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, तेव्हापासून ही पोशाखाची परंपरा अखंड सुरू आहे. याच काळात मंदिर विद्युत रोषणाईने सजवले जाते. गावातील विद्युत क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व युवक मिळून हे विद्युत रोषणाईचे काम करतात. या काळात मंदिर परिसराची स्वच्छता केली जाते. रविवारी सिध्दनाथाची शेतक-याच्या वेषात पूजा बांधण्यात आली होती.

अंडरटेकरची WWE मधून निवृत्ती:आपल्या फेमस वॉकसह रिंगमध्ये घेतली शेवटची एंट्री

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!