महाबळेश्‍वर-केळघर रस्त्याला भूस्खलनाचा धोका


 

स्थैर्य, महाबळेश्‍वर, दि. २५ : केळघर रस्त्याच्या बांधकामात  रेंगडीच्या भूगर्भ शास्त्रज्ञाच्या अहवालानुसार कोणतीही उपाययोजना न करता रस्त्याचा कामाचा प्रकार बदलत लॉकडाउनमध्ये काम केल्याने अडचण निर्माण झाली आहे. भूस्खलनाचा धोका कायम राहात बोंडारवाडी व भावळे गावे गाडली जाण्याची भीती भूगर्भ शास्त्रज्ञांनी दिलेल्या अहवालात व्यक्त केली आहे.

केळघर घाटातील रेंगडी गावाजवळील भागाचा भूगर्भशास्त्रज्ञांनी 2018 साली सर्व्हे केला होता. त्यांच्या अहवालानुसार फक्त कागदोपत्री सुरक्षेकरिता महसूल विभागाने देखील भावळे, रेंगडी, बोंडारवाडी गावांना धोका असल्याच्या नोटिसा दिल्या होत्या. मात्र ठेकेदार आणि त्यांच्या कंपनीकडून काळाकडा ते रेंगडी गावापर्यंतचा रस्त्या करताना भूस्खलनाचा धोका असतानाही कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाला या अहवालाची माहिती असताना त्यांनी डोळे झाकूनच हे काम पुढे नेलं. महाबळेश्‍वर ते काळाकडा या रस्त्याच्या बांधकामात काही महत्त्वाच्या बाबींमध्ये त्रुटी राहिल्या आहेत, ज्या पुढे धोकादायक ठरू शकतात. त्याकडे लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्य जनता, चालक आणि प्रवाशांकडून होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!