कोरोनात सायबर क्राइम 350% वाढले


स्थैर्य, दि.३१: 2020 हे वर्ष कोविड-19 महामारीच्या नावे ठरले आहेत. पण या नावाचा वापर करुन सायबर क्राइमही मोठ्या प्रमाणात वाढले. सायबर क्रिमिनल्सने ज्या पध्दती अवलंबल्या त्यामध्ये साहित्याच्या होम डिलीवरीच्या नावावर फसवणूकीपासून सोशल मीडियावर कुणाच्या नावावर फेक प्रोफाइल क्रिएट करुन त्यांच्या मित्रांकडून पैसे मागण्याचाही समावेश आहे. यूएन अनुसार सर्वच देशांमध्ये कोविड दरम्यान सायबर क्राइम 350% वाढला आहे. कोविड संबंधित डेटा हॅकिंगही होत आहे आणि एक्सपर्ट्सनुसार असे करण्यात सरकारचाही समावेश आहे. एक देश दुसऱ्या देशात व्हायरस आणि व्हॅक्सीन बनवण्याचा डेटा हॅक करुन घेत आहेत. यासाठी ग्रे मार्केटमध्ये बोलीही लावली जात आहे.

कोविड व्हॅक्सीनच्या बुकिंगच्या नावावर फसवणूक
जयपूर पोलिसांच्या सायबर क्राइम कंसल्टेंट मुकेश चौधरी यांनी सांगितले सर्वात नवीन पद्धत कोविड-19 व्हॅक्सीनच्या नावाने फसवणूक करण्याची आहे. सायबर क्रिमिनल व्हॅक्सीनच्या नावावर लोकांना फोन करत आहेत. ते म्हणतात ‘तुम्ही आत्ताच व्हॅक्सीन बुक करा, ही तुमच्या घरी डिलीवर केली जाईल. सध्या ही ऑफ मर्यादित लोकांसाठी आहे’ सायबर क्रिमिनल बुकिंगच्या नावावर लोकांकडून पैसे घेत आहे. तर सरकार आणि कोणत्याही कंपनीने अशा प्रकारची कोणतीही घोषणा केलेली नाही.

ऑनलाइन शॉपिंग आणि होम डिलीवरीच्या नावावर फसवणूक
सायबर क्रिमिनल्सने बँक आणि ऑनलाइन शॉपिंग पोर्टल सारखी वेबसाइट बनवून लोकांची फसवणूक केली. चौधरी यांनी सांगितले की, मुंबईच्या एका व्यक्तीने दारुच्या होम डिलीवर 60 हजारर रुपयांची पेमें केली होती. मात्र डिलीव्हरी होणारही नव्हती आणि झालीही नाही. अशा प्रकारच्या अपराधांसाठी क्रिमिनल्सने फेसबुकवर पेज क्रिएट केले होते आणि तेथूनच ते लोकांना ऑफर पाठवत होते.

घरी बसून काम करण्याच्या नावावर घेतले पैसे
लॉककडाउनमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. सायबर एक्सपर्ट अभिषेक धाभाई यांनी सांगितले की, घरी बसून काम करण्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली. काम करण्याच्या नावावर लोकांकडून अडवान्स पैसे घेण्यात आले. ही पद्धत पहिल्यापासूनच चलनात आहे. मात्र या काळात ही जास्त वाढली. यासोबतच लोकांना सरकारी एजेंसीच्या नावावर ईमेल पाठवण्यात येत आहेत. यामध्ये म्हटले जात आहे की, तुम्ही कोविड पेशेंटच्या संपर्कात आले आहेत. यानंतर ऑनलाइन फॉर्म भरुन घेतला जातो. ज्यामध्ये वयक्तीक माहिती विचारली जाते.

मोबाइल अॅप्सच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्यांवर आत्महत्येची वेळ
अ‍ॅप डाउनलोड करताना वापरकर्त्याच्या फोन बुक आणि गॅलरीचा अॅक्सेस घेतला जातो. जर एखाद्याने कर्ज घेतले असेल आणि वेळेवर हप्ता न दिल्यास फोन बुकवरून नंबर घेऊन त्यांना मॅसेज पाठवला जातो की, अमुक व्यक्तीने लोन घेतले आहे आणि त्याने तुमचा नंबर दिला आहे. जर तुम्ही वेळेवर हप्ता भरला नाही तर तुमच्याकडून पैसे वसूल केले जातील. अशाच एका घटनेत हैदराबादमधील दोन मुलींनी आत्महत्या केली होती. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनीही काही लोकांना अटक केली. मुंबई, दिल्ली, बंगळुरूसह बर्‍याच प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.

कोविड व्यतिरिक्त नवीन प्रकारचे सायबर गुन्हे
ज्या लोकांनी फेसबुकवर आपला मोबाइल नंबरलाच यूजर नेम आणि त्यालाच पासवर्ड ठेवले आहे. क्रिमिनल त्यांना निशाणा बनवतात. त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये जाऊन लोकांना पैसे पाठवण्याची रिक्वेस्ट करतात. जे लोक सोशल मीडियाचा जास्त वापर करत नाहीत, त्या लोकांना यामध्ये निशाणा बनवले जाते. फेसबुक यूजर्सला अजुन एका पध्दतीने निशाणा बनवले जात आहे.

गुन्हेगार सरकारी अधिकाऱ्याच्या फेसबुक खात्याचे बनावट प्रोफाइल तयार करतात. ते अधिकाऱ्याच्या नावाचा डिस्प्ले कॉपी करतात आणि ते लावून बनावट आयडी बनवतात. ज्यांची फ्रेंडलिस्ट व्हिजिबल आहे, त्यांची नावे घेऊन फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात आणि त्यांच्याकडून पैशांची मागणी करतात. डीआयजी रँकपर्यंतच्या अधिकाऱ्यांसह अशा घटना घडल्या आहेत.

ऑनलाइन फसवणूक कशी टाळावी
तज्ञांच्या मते, फिशिंग ईमेलपासून सावध रहा. जर ईमेलमध्ये कोणत्याही प्रकारची माहिती विचारली गेली असेल किंवा आपल्याला फॉर्म भरायला सांगितला असेल तर प्रथम ईमेलचा स्त्रोत योग्य आहे की नाही ते तपासा. अँटीव्हायरस आणि फायरवॉल अपडेट ठेवा. सोशल नेटवर्किंग साइटच्या स्थान किंवा घराबद्दल कोणतीही माहिती अपलोड करू नका. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) चा वापर चांगला आहे. यामुळे आयपी अॅड्रेस लपवला जातो. सोशल मीडियावर मित्रांची यादी किंवा फोटो गॅलरी सर्वांसाठी ओपन ठेवू नका. याशिवाय मोबाइल नंबरला यूजर नेम आणि पासवर्ड बनवू नका. कारण याचा अंदाज काढणे खूप सोपे असते.


Back to top button
Don`t copy text!