
स्थैर्य, फलटण, दि. ३१ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमिन्स इंडिया फॉउंडेशनतर्फे फलटण शहरातील गोरगरीब नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरु आहे. बेघर, बेरोजगार, भटके, कचरा वेचक, वीटभट्टीवर काम करणारे मजूर, तसेच इतर गोरगरीब नागरिकांना घरटी १० किलो धान्य वाटप केले. यामध्ये गहू, बाजरी, तेल, तूरडाळ, हरबरे, चवळी, मटकी, शेंगदाणे इ.वस्तूंचा समावेश आहे.कमिन्स इंडिया फॉउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे आणि सहकार्यामुळे गरजुंना चांगला दिलासा मिळत आहे.
कमिन्स इंङिया फौंङेशनच्या वतीने शहरामध्ये स्वच्छता मित्र साहित्य संचमध्ये दोन हँडग्लोव्हस, दोन साबण, दोन कापडी मास्कचा समावेश असून सदर साहित्य नगरपरिषद कर्मचारी, सरकारी दवाखान्यातील कर्मचारी, पोलीस, आशा वर्कर, आरोग्य सेविका, सफाई कर्मचारी व डेपोवरील कामगार यांना देण्यात आले आहे. सरकारी दवाखान्यातील डॉक्टर्स नर्स, आरोग्य सेविका व इतर कर्मचारी यांना गॉगल्सही पुरविण्यात आलेले आहेत. याशिवाय आता कमिन्स इंडिया फॉउंडेशन फलटण शहरातील त्याचप्रमाणे सरकारी रुग्णालयांतील डॉक्टर्स व नर्सेस यांना वैयक्तिक सुरक्षा उपकरणे यामध्ये थर्मामिटर, पल्स औक्सिमिटर, फुलबॉङी सूट, एन 95 मास्क्स्, वस्तूं सर्जिकल कॅप, सर्जिकल गाऊन, सर्जिकल ग्लोव्हस, शूज कव्हर, गॉगल्स, प्लास्टिक ड्रेप, वेस्टकॅरीबॅग इत्यादीं पुरविण्यात येणार आहे.