
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा

स्थैर्य, सातारा, दि.13: महागाव, ता. सातारा गावच्या हद्दीत कार व दुचाकीच्या अपघात होवून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी कारचालकावर सातारा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, सातारा-कोरेगाव मार्गावर महागावच्या हद्दीत कारची (एमएच 14 एएम 0529) मोटारसायकलला जोरधार धडक बसली होती. यात दुचाकीस्वार अल्पेश भिमराव सावंत वय 21 हा युवक डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाला. तसेच दुचाकीचेही 45 हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने कार चालवून अपघातास कारणीभूत ठरणार्या काल चालक दीपक मधुकर जाधव (वय 35 रा. सांगवी, ता. कोरेगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास म.पो. ना. मोरे करत आहेत.





