अपघातप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.३१: उडतारे, ता. वाई येथे मालट्रकला टेम्पोची पाठीमागून धडक बसली. याप्रकरणी निष्काळपणे वाहन चालवून अपघाताला कारणीभूत असणार्‍या टेम्पोचालकावर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तुषार बाळासो यादव वय 23 रा. यादववाडी शिरोली पुलाची, ता. हातकणंगले अस टेम्पोचालकाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, उडतारे, ता. वाई गावच्या हद्दीत उड्डाण पुलापुढे टेम्पोच्या (एमएच 09 एफएल 2034) चालकाने हयगयीने व निष्काळजीपणे टेम्पो वेगात चालवला. या भरधाव टेम्पोची धडक पुढील मालट्रकला बसली. यात ट्रकमधील मजूर विशाल बाळासो यादव जखमी झाला. अपघातप्रकरणी टेम्पोचालक तुषार यादव याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पो. ना. धायगुडे तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!