करंजेत अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा


स्थैर्य, सातारा, दि.२६: पिलेश्‍वरीनगर, म्हसवे रोड, करंजे, ता. सातारा येथे महिंद्र पिक-अप गाडीच्या चालकाने रिव्हर्स घेतल्याने धडक बसून महिला जखमी झाली. याप्रकरणी चालक अजय निवृत्ती कदम याच्यावर गुन्ह दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, पिलेश्‍वरी नगर येथे दि. 25 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास सौ. साधना रमेश महाडिक या घराजवळ रस्त्याकडेला नारळाच्या झाडाच्या झावळ्या काढत होत्या. यावेळी अचानक अजय कदम याने पूर्व बाजूकडून महिंद्रा पिक गाडी भरधाव वेगात रिव्हर्समध्ये आणली. या गाडीचे धडक साधना महाडिक यांना बसून त्या जखमी झाल्या. याप्रकरणी अजय निवृत्ती कदम यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून तपास हवालदार दबडे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!