
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण, दि. २७ : साखरवाडी ता. फलटण येथील दत्त इंडिया कंपनीचा न्यू फलटण शुगर वर्क्स या कारखान्याचा या वर्षीचा गळीत हंगाम मंगळवार दि. ३० मार्च रोजी बंद होणार आहे. तरी कारखाना कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील सर्व ऊस उत्पादकांना कळविणेत येते की, आपला नोंदीचा ऊस कोणत्याही कारणाने शेतात शिल्लक असल्यास अशा शेतकऱ्यांनी कारखान्याच्या नजिकच्या शेती विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन दत्त इंडिया कंपनी मार्फत प्रशासकीय अधिकारी अजित जगताप यांनी केलेले आहे.
ज्या शेतकऱ्यांचा ऊस कोणत्याही कारणाने तोडणीचा राहिलेला आज. अश्या सर्व शेतकऱ्यांनी स्वतः ऊस तोडणी व वाहतुक करुन कारखान्यास सत्वर गळीतास पाठवावा, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.
