
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि. 17 : गोडोली, सातारा येथील सौभाग्य मंगल कार्यालय परिसरात महिलेस दमदाटी व शिवीगाळ करणार्यावर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. भरत रघुनाथ मोहिते रा. बारावकर नगर, सातारा, असे संशयीताचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, दि. 16 रोजी येथील तक्रादार महिलेच्या पान टपरी दुकानासमोर भरत मोहिते हा दारू पिवून आला. संबंधित महिलेची ओळख नसतानाही त्याने तू माझे एटीएम कार्ड घेतले आहे. असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देवून शिवीगाळ केली. त्याठिकणी लोक जमल्यानंतर त्याचे नाव भरत मोहिते असल्याचे समजून आले. त्यानंतर संबंधित महिलेने सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर भरत मोहिते याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपोनि मोरे करत आहेत.
