पिंपरी येथे गाव कृती समितीस शिवीगाळ व दमदाटी प्रकरणी गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, कोरेगाव, दि. 24 : पिंपरी (ता. कोरेगाव) येथे गावच्या कृती समितीस शिवीगाळ करुन बघून घेईन, अशी दमदाटी करुन विलगीकरण कक्षात राहणार नाही म्हणून दोघांच्यावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबतची फिर्याद तलाठी अनिल जयसिंग दिंडे यांनी दिली. अमर जालिंदर माईनकर (वय 40), तेजस्वी अमर माईनकर (वय 25) हे व त्यांची अल्पवयीन मुले सृष्टी अमर माईनकर (वय 10), निर्माण अमर माईनकर (वय 12) चौघेजण हे पिंपरी गावाचे रहिवाशी नसून सुध्दा (मूळ रा.मायणी, ता. खटाव) येथे मूळ गावी न जाता पिंपरी येथे राहण्यास आले. त्यांना विलगीकरण कक्षात राहण्यास सांगितले असता पिंपरी गावच्या कृती समितीस शिवीगाळ करुन तुम्हास काय करायचे आहे ते करा, मी बघून घेईन, अशी दमदाटी करुन विलगीकरण कक्षात राहणार नाही, असा दम दिला. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास महिला पोलीस नाईक आय. व्ही.घाडगे करीत आहेत. 

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!