
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, कोरेगाव, दि. 24 : दुर्गळवाडी, ता. कोरेगाव येथे अज्ञात वाहनाने विनापरवाना आल्यावरुन युवतीवर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबतची फिर्याद तलाठी पृथ्वीराज शिवराज पाटील यांनी दिली. निकिता आबासाहेब यादव (वय 19) रा. दुर्गळवाडी, ता.कोरेगाव हिने कोविड -19 या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव व संसर्ग होईल, हे माहित असताना सुध्दा विनापरवाना जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लघंन करुन अज्ञात वाहनाने दुर्गळवाडी येथे आली म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस नाईक जे.जी भुजबळ करीत आहेत.
