
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.०६ मार्च २०२२ । फलटण । मिरेवाडी ( फलटण ) येथे जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी एका विरोधात लोणंद पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत लोणंद पोलिसांनी सांगितले की, मिरेवाडी ता. फलटण गावचे हद्दीत अविनाश सावता शिंदे याचे घराचे पुढे कंपाऊंडचे गेटचे आतमध्ये मी तुला दिलेले पैसे कधी देणार आहेत असे विचारले असता अविनाश सावता शिंदे रा.मिरेवाडी ता.फलटण याने भारत रघुनाथ जाधव कुसुर ता.फलटण यांना जातीवाचक शिवीगाळ करुन तुझे कसले पैसे ? परत जर पैसे मागायला आला तर जिवे मारुन टाकील अशी धमकी व मला दोन कानाखाली मारल्या व मला हाकलुन दिले.
आम्ही सदर घडले प्रकाराबाबत तक्रारी अर्ज दिला होता. त्याबाबत अविनाश सावता शिंदे याच्या विरोधात भारत रघुनाथ जाधव यांनी लोणंद पोलीसात तक्रार दिली आहे.
