शस्त्र बाळगल्या प्रकरणी युवकावर गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ०६ ऑगस्ट २०२२ । सातारा । येथील कल्याणी शाळेसमोर असणाऱ्या गार्डन परिसरात चाकु बाळगल्या प्रकरणी एका युवकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. निखिल रामदास दुर्वे, वय १९, रा. गुरुवार पेठ, सातारा असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३ ऑगस्ट रोजी ९ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील कल्याणी शाळेसमोर असणाऱ्या गार्डन परिसरात निखिल रामदास दुर्वे यांच्याकडे १४ इंच लांबीचा एक चाकु आढळून आल्याची तक्रार महिला पोलीस हवालदार उषा शंकर खरात यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी निखिल दुर्वे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button
Don`t copy text!