दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑगस्ट २०२२ । सातारा । अल्पवयीन युवतीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी एका युवकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 ऑगस्ट रोजी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान रूपाली चंद्रकांत लोणार वय 17 हिला अजय जाधव 19, राहणार विजापूर, कर्नाटक याने प्रेम संबंधातून फूस लावून पळवून नेले असल्याची फिर्याद रेणुका चंद्रकांत लोणार वय 33, राहणार मोरे कॉलनी, सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक फरांदे करीत आहेत.