
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑगस्ट २०२२ । सातारा । युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहराशेजारील उपनगरात राहत असलेली युवती दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सातारा एसटी स्टँड या ठिकाणी घरी जाण्यासाठी आली असताना सौरभ चव्हाण राहणार गुरुवार बाग शेजारी, सातारा याने संबंधित युवतीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून सहाय्यक पोलीस फौजदार डी. जी. पवार अधिक तपास करीत आहेत.
